1 याहवेहचे स्तवन करा.
याहवेहसाठी एक नवे गीत गा,
त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.
3 त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत,
डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.
4 कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो;
ते नम्रजनांस विजयी करतात.
5 या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत
आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.