6 मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल;
माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका.
7 तुमचा आश्रय घेणार्यांना
त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता,
तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.
8 तुमच्या पंखांच्या छायेखाली
तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;
9 मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून,
जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा.