9 याहवेहचे भय निर्मळ आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहेत.
याहवेहचे निर्णय स्थिर आहेत,
आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत.
10 सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत,
अतिशुद्ध सोन्यापेक्षाही;
ते मधापेक्षा मधुर आहेत,
पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.
11 कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात;
त्याचे पालन करणार्यास मोठे प्रतिफळ मिळते.