6 आता मला माहीत आहे:
याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात;
पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या
उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.
7 कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात,
परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
8 ती कोसळतील आणि नाश पावतील,
पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.