3 याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल?
त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?
4 ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे,
जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही,
जो खोटी शपथ वाहत नाही.24:4 किंवा खोट्या दैवतांची
5 त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल.
त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.