दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
मी कोणाचे भय बाळगू?
याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—
मला कोणाचे भय आहे?
5 कारण संकटाच्या दिवसात
ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील;
तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील;
उंच खडकावर मला सुरक्षा देतील.