1 याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे!
कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!
2 पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात,
"परमेश्वर त्याची सुटका करणार नाही." सेला3:2 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे.
3 परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात.
माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.
4 मी याहवेहचा धावा करतो,
आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला
5 मी पहुडतो आणि झोप घेतो;
मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.
6 असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील,
तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.