8 याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या;
जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
9 याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा,
कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही.
10 तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील,
परंतु याहवेहचा शोध घेणार्यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.
11 माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका;
याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन.