7 हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे!
सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते.
8 तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता;
आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता.
9 कारण जीवनाचा झरा तुमच्याजवळ आहे;
तुमच्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश मिळतो.