4 याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा
आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या;
माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.
5 पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे;
माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे;
प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा
केवळ एक श्वास आहेत. सेला