संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
1 जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य;
याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील.
2 याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील—
ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील—
ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत.
3 ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात;
ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.