6 मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही.
माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही.
7 आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता;
आमचा द्वेष करणार्यांना तुम्ही लज्जित करता.
8 आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो.
आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला