1 परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;
संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
2 पृथ्वी उलथीपालथी झाली
आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,
3 सागरांच्या जलांनी गर्जना केल्या,
आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला46:3 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे