11 परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत;
त्यांना सदैव हर्षगीते गाऊ द्या.
तुम्ही त्यांचे रक्षण करता,
ज्यांना तुमचे नाव प्रिय आहे, त्यांनी तुमच्यामध्ये आनंद करावा.
12 याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता;
तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.