Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 51:1,2,4-9

1 परमेश्वरा, तुमच्या

प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा,

तुमच्या महान करुणेनुसार

माझे अपराध पुसून टाका.

2 मला धुऊन माझे अपराध काढून टाका

आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा.

4 तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे

आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे;

म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे

आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.

5 मी तर जन्माचाच पापी आहे,

माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे.

6 पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते,

म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले.

7 एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन;

मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.

8 आनंदाची व हर्षाची वाणी मला ऐकू द्या;

म्हणजे तुम्ही चिरडलेली माझी हाडे प्रफुल्लित होतील.

9 माझ्या पातकांपासून आपले मुख फिरवा

आणि माझे सर्व अपराध पुसून टाका.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.