10 परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा
आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
11 मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका
व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.
12 तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या
आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.