16 परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य
आणि तुमची दया यांची गीते गाईन,
कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे
आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.
17 हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे,
कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा,
तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.