1 हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित65:1 अपेक्षित किंवा योग्य आहे आहे;
तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.
2 तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता,
म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील.
3 आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली,
तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा65:3 किंवा प्रायश्चित केले केली.