1 अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा!
2 त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा;
ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.
3 परमेश्वराला म्हणा, "तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत!
तुमच्या सामर्थ्यामुळे
तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.
4 पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील;
ते तुमच्या गौरवांची गीते गातील,
ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील." सेला