26 कारण ज्याला तुम्ही शासन केले, त्याचाच ते छळ करतात,
आणि ज्याला तुम्ही घायाळ केले, त्यांच्या वेदनेबद्दल ते बोलतात.
27 त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा
आणि तुमच्या तारणाचा वाटा त्यांना देऊ नका.
28 जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत;
नीतिमानांच्या यादीत त्यांची नावे येऊ नयेत.