आसाफाचे मासकील.
1 अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका;
माझ्या मुखातून निघणार्या वचनाकडे कान द्या.
2 मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन;
मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन;
3 ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे,
त्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्या आहेत.
4 आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही,
आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे,
याहवेहचे गौरव करू आणि
त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.