संगीत दिग्दर्शकासाठी; मूथ लब्बेन रागावर आधारित दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन;
मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2 मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन;
हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन.