1 जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
2 मी याहवेहला म्हणेन, "तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,
माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे."
3 कारण ते पारध्याच्या पाशापासून
आणि प्राणघातक मरीपासून
तुझे रक्षण करतील.
4 ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील,
त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल;
त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.