1 याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा;
हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.
2 याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा;
दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
3 सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव,
सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.