दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
मी कोणाचे भय बाळगू?
याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—
मला कोणाचे भय आहे?
2 जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास
माझ्यावर हल्ला करतील,
तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच
अडखळतील आणि पडतील.
3 जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला,
तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही;
माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले,
तरी मी निश्चिंत राहीन.